पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. पाऊस पडल्यानंतर गरमागरम कांदाभजी आणि आल्याच्या चहाचा आस्वाद घेतला जातो. पण सतत तिखट, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. अपचनाच्या समस्या उद्भवल्यानंतर सतत आंबट ढेकर येणे, मळमळ तर काहीवेळा डोकेदुखीची समस्या सुद्धा उद्भवते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सूप बनवून प्यावे. वेगवेगळ्या भाज्या आणि चिकनपासून बनवलेले सूप चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सूप प्यायल्यास आजारांपासून सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
तळलेले तिखट पदार्थ खाण्याऐवजी पावसाळ्यात घरी बनवा 'हे' गरमागरम पौष्टिक सूप, सर्दी खोकल्यापासून राहाल लांब

शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी सुपरफूड मानल्या जातात. लहान मुलं शेंगा खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना शेवग्याच्या शेंगांचा वापर करून बनवलेला सूप प्यावे. यामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या समस्या पावसाळ्यात प्रामुख्याने उद्भवतात. यावरील रामबाण उपाय म्हणजे आलं लसुणचा वापर करून बनवलेले चविष्ट सूप. कमीत कमी साहित्याचा वापर करून बनवलेले कोथिंबीर सूप चवीला अतिशय सुंदर लागते. लसूण आणि आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये टोमॅटो सूप घरी बनवून प्यायले जाते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे झटपट तयार होणारे गाजर टोमॅटो सूप सकाळच्या नाश्त्यात उत्तम आहे.

पावसाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. अशावेळी मक्याच्या दाण्यांचा वापर करून बनवलेले सूप प्यावे. मक्याचे दाणे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यामध्ये फायबर युक्त घटक असतात.

पारंपरिक पद्धतीने मूग डाळ आणि मसूर डाळीचा वापर करून बनवलेले कढण पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. डाळींमध्ये खूप जास्त प्रोटीन असते. त्यामुळे आवर्जून डाळींपासून बनवलेले कढण प्यावे.






