भारतात क्रिकेटचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा नवा सिझन काही तासांमध्ये सुरु होणार आहे. २०२५ चा नवा सिझन २२ मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामनाच ब्लॉकबस्टर होणार आहे. जिथे कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम अनेक प्रकारे खास असणार आहे. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे, या सीझनमध्ये आता काही खेळाडू कर्णधाराच्या अवतारात दिसणार आहेत.
आयपीएल २०२५ मधील संघाचे नवे कर्णधार. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अक्षर पटेलने मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये उपकर्णधार पद सांभाळले होते. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंत कायम ठेवले नाही त्यामुळे आता अक्षर पटेल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फोटो सौजन्य - Delhi Capitals सोशल मीडिया
कोलकाता नाईट राइडर्सचा संघाने श्रेयस अय्यरला कायम ठेवले नाही त्यामुळे आता आयपीएल २०२५ चे केकेआरचे नेतृत्व अजिंक्य राहणे करणार आहे. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर चाहत्यांची नजर असणार आहे. फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे मागील वर्षी कर्णधारपद फाफ डूप्लेसीने सांभाळले होते. पण यावेळी संघाने त्याला कायम ठेवले नाही त्यामुळे या सीझनचा नवा कर्णधार रजत पाटीदार याला करण्यात आले आहे. फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने संघ सोडला आहे, त्यामुळे LSG चे कर्णधारपद रिकामी होते. यावेळी लखनौ सुपर जायंट्सने रिषभ पंत २७ कोटींना विकत घेतले होते. यावेळी रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद सांभाळणार आहे. फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
पंजाब किंग्सचा संघ यावेळी मागील वर्षाचा विजेता कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. यावेळी पंजाब किंग्सच्या संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. फोटो सौजन्य - Punjab Kings सोशल मीडिया
मागील वर्षांपासून हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे. पण संघाची कामगिरी फार काही चांगली नव्हती त्यामुळे आता मुंबई इंडियाच्या संघाची आयपीएल २०२५ मधील कामगिरी कशी असेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल. फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया