आपल्या आरोग्यासाठी पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे, ते आपल्या शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर राहतात. कधीकधी जास्त पाणी पिण्यानेदेखील अनेक नुकसान होऊ शकतात. अति पाणी पिण्याचा नक्की काय त्रास आहे याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी माहिती दिली आहे. आपण या लेखातून त्याबाबत अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
पाणी हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि दिवसभरात साधारण 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र जास्त पिणे पिणे त्रासदायक ठरते का जाणून घेऊया
जर तुम्हाला एवढे पाणी पिण्यानंतरही तहान लागत नसेल तर याचा अर्थ तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात आणि जर लघवीचा रंग हलका पिवळा किंवा स्वच्छ असेल तर ते चांगले आरोग्य दर्शवते
जर आपण महिलांबद्दल बोलायचे म्हटले तर त्यांना २ ते ३ लिटर या दराने १२-१४ ग्लास पाणी प्यावे लागते. हे देखील लक्षात ठेवा की पाण्यासोबतच रस आणि चहासारखे इतर द्रवपदार्थदेखील त्यात समाविष्ट केले जाऊ शकतात
पुरुषांनी दिवसातून किती पाणी प्यावे? याचं उत्तर म्हणजे पुरुषांनी दिवसातून ३.५ ते ४ लिटर पाणी प्यावे, म्हणजे त्यांनी सुमारे १५-१६ ग्लास पाणी प्यावे असे सांगण्यात येते
दिवसातून किती पाणी पिणे योग्य आहे हे अनेकांना माहिती नसते. ही गोष्ट पूर्णपणे वय, वजन, हवामान आणि आरोग्यावर अवलंबून असते आणि आम्ही तुम्हाला पुरुष आणि महिलांसाठीचे नियम सांगणार आहोत
जास्त पाणी पिण्यात काही नुकसान आहे का? जर तुम्ही जास्त पाणी प्यायले तर शरीरातील सोडियमची पातळी बिघडू शकते ज्याला हायपोनेट्रेमिया म्हणतात. शरीरात पाणी असते पण रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येणे अशी लक्षणे देखील दिसू शकतात