जपानमधील लोक त्यांच्या कार्यक्षम, कडक आणि उत्कृष्ट शिक्षण धोरणांसाठी ओळखले जातात. जपानची शिक्षण व्यवस्था सतत सुधारणांना प्रोत्साहन देते. याशिवाय जपानमध्ये दीर्घकाळ जगणारे लोकही दिसून येतात. जपानी व्यक्ती अतिशय हेल्दी पद्धतीने जीवन जगत असल्याने 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जगणाऱ्या व्यक्ती इथे आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे जपानी लोक आपल्या शरीरासह आपल्या मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला 5 माइंड हॅक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला स्वतःला सुधारण्यास मदत करतील (फोटो सौजन्य - IStock)
जपानी लोकांकडे हेल्दी राहण्यासाठी जशी कला आहे तशीच कला आपले मानसिक आरोग्य चांगले ठेऊन मन शांत करण्यासाठीही आहे. यासाठी नक्की कोणते टेक्निक वापरावे जाणून घेऊया
काईजेन ही सतत आपल्यात सुधारणारी कला जपानच्या शिक्षण आणि संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग मानली जाते. या तंत्रात, तुम्हाला स्वतःमध्ये सतत लहान सुधारणा कराव्या लागतील. यामध्ये, कोणताही विद्यार्थी स्वतःसाठी सवयी विकसित करतो आणि वेळेनुसार त्या पूर्ण करायला शिकतो
जपानी विद्यार्थी सहसा सतत किंवा दीर्घ अभ्यास सत्रांचे पालन करतात यासाठी ध्यानाचा आधार घेतात. हे तंत्र तुम्हाला तुमच्या ध्येयांवर आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यामुळे कमी वेळेत कोणताही विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते
जपानमध्ये, कोणतेही काम पुन्हा करणे कंटाळवाणे मानले जात नाही तर ते प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न मानले जाते. यामध्ये, ते काम तुमची सवय बनवण्याचा प्रयत्न केला जातो
काहीही शिकण्यात पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. हे लक्ष विचलित होण्यापासून रोखण्यास मदत करते. तसंच यामुळे तुम्हाला चंचल मन शांत करण्यास मदत मिळते
जपानमधील अनेक विद्यार्थी हे अभ्यास करण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा करतात जेणेकरून त्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते आणि मनावर ताणही येत नाही