टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी आहे. 'कांटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. अनेक बातम्यांमध्ये असे म्हटले जात आहे की हृदयविकाराचा झटका हे तिच्या मृत्यूचे कारण आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कोणासाठीही कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ही अभिनेत्री इतकी लोकप्रिय कशी झाली? एका रात्रीत शेफाली जरीवालाचे आयुष्य बदलले होते आणि त्यावेळी ती फक्त आणि फक्त १९ वर्षांची होती (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शेफाली जरीवालाचा जन्म १९८२ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. २००२ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने संगीत क्षेत्रात प्रवेश केला. हे गाणे इतके हिट झाले की ती एका रात्रीत स्टार बनली.
या गाण्यातील शेफालीचे नृत्य आणि तिची शैली इतकी किलर होती की प्रत्येकजण तिचे चाहते बनले. त्यानंतर लोक तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखू लागले
Shefali jariwala death She eat refrigerated food and bloods pressure drop
शेफालीने अनेक रियालिटी शोमध्येही हात आजमावला. यामध्ये 'बूगी वूगी', 'नच बलिये ५' आणि 'नच बलिये ७' सारखे डान्स रियालिटी शो समाविष्ट आहेत. याशिवाय तिने 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला होता
'बिग बॉस १३'फेम अभिनेत्री शेफाली जारीवाला हिचं शुक्रवारी रात्री निधन झालं. अंधेरीतील गोल्डन रेंज नावाच्या इमारतीत शेफाली पती पराग त्यागीसोबत राहत होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर इमारतीचे वॉचमन शत्रुधन महतो यांनी काल रात्री जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हाची घटना माध्यमांना सांगितली. रिपोर्ट्सनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल आले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
त्यानंतर अभिनेता पराग त्यागीने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. त्यानंतर दोघांनीही २०१४ मध्ये लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेफालीची एकूण संपत्ती सुमारे ७.५ कोटी रुपये आहे