भूक लागणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण सतत भूक लागत असणे, म्हणजे काही तरी गडबड आहे. अशा वेळी स्वतःजवळ काही तरी अशा पदार्थांचे असणे गरजेचे आहे, जे सतत आपल्याला ऊर्जा देत राहील आणि आपल्या ऊर्जेचे स्त्रोत बनेल. हे स्नॅक्स आपल्या जवळ असणे म्हणजे आपल्याला सतत लागणाऱ्या भुकेपासून वाचवणे.
चला तर मग जाणून घेऊयात अशा उर्जादायी स्नॅक्सबद्दल. (फोटो सौजन्य - Social Media)
अत्यंत पौष्टिक असलेले स्प्राउट्स तुम्हाला ऊर्जा देतील आणि त्वरित भूक शमवतील. हे शरीरासाठी उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे.
फ्रूट चाटमध्ये असलेल्या फळांमुळे शरीराला ताजेपणा आणि आवश्यक व्हिटॅमिन्स मिळतात, तसेच भूकही शांत होते.
रोस्टेड मखाना हे कमी कॅलरी आणि उच्च पौष्टिक स्नॅक आहे, ज्यामुळे भूक लगेच शांत होते.
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुम्हाला दीर्घकाळ तृप्त ठेवते आणि पचनतंत्र सुधारते.
भाजलेले चने हे सहज खाण्यासाठी उपलब्ध आणि भरपूर फायबरयुक्त असल्याने भूक भागवण्यासाठी आदर्श स्नॅक आहेत.