काय घडलं नेमकं?
लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुर्जर चौक येथे राहणाऱ्या नईम यांच्या 6 वर्षीय मुलीचा रविवारी वाढदिवस होता. त्यावेळी, मामा सलीम आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा पार्टीत बोलावलं आणि संध्याकाळी तो आपल्या मुलीला घेऊन पार्टीत आला. त्यावेळी त्याचा मेहुणा युनूस सुद्धा बर्थडे पार्टीसाठी आला होता. केक कटिंगनंतर, डीजेच्या गाण्यावर सगळे डान्स करत असतांना सलीमच्या मुलीसुद्धा सगळ्यांसोबत नाचू लागल्या. हे पाहून सलीम संतापला. त्याने आपल्या मुलींचा हात पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, त्याच्या मेहुणा यूनुसने दाजीला समजवण्यासाठी थांबवले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून सालिमने आपल्या मेहुणा युनूसवर चाकूने वार केला. युनूस यावेळी गंभीर जखमी झाला. युनूस रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेले असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला असून तेथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्येत वापारण्यात आलेला चाकू सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेतील मृतकाचे नाव युनूस (37) आहे तर आरोपीचे नाव सलीम (60) असे आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Ans: मेरठ, लिसाडी गेट पोलिस स्टेशन हद्दीत.
Ans: डीजेवर मुली नाचल्याने दाजीचा संताप आणि हस्तक्षेप.
Ans: आरोपीला अटक, शस्त्र जप्त; मृतदेह पोस्टमॉर्टमला.






