आपल्या समाजात किन्नर (तृतीयपंथी) समुदायाला फार महत्त्व दिले जाते. त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा मानला जातो, ज्यामुळे प्रत्येक शुभ अथवा आनंदाच्या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तृतीयपंथी कधीही लग्न करत नाहीत असा अनेकांचा समज आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तृतीयपंथी देखील लग्न करतात आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते विधवा होतात. याचे कारण एका कथेशी जोडलेले आहे आणि ही कथा महाभारताशी संबंधित आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Kinnar Marriage: किन्नरही लग्न करतात? विवाहाच्या दुसऱ्या दिवशीच होतात विधवा; काय आहे यामागची कथा...
एक दिवशी लग्न करुन मग दुसऱ्या दिवशी विधवा होण्याची ही प्रथा एका कथेशी जोडली गेली आहे. यानुसार, इरावन हा अर्जुनाचा मुलगा होता, ज्याने महाभारतात पांडवांच्या वतीने सहभाग घेतला होता
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान कृष्णाने मोहिनी रुप धारण करुन इरावणशी लग्न केले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी महाभारत युद्धात इरावनचा मृत्यू झाला, ज्यामुळे मोहिनी विधवा झाली
किन्नर समुदाय इरावनला आपले आराध्यदैवत मानतात. परंपरेनुसार तेही आपल्या आयुष्यात एकदा इरावनशी लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला विधवा मानून त्याचा शोक व्यक्त करतात
तृतीयपंथ्यांचा हा एक अनुष्ठान आहे, ज्यात ते आपली भक्ती आणि सामाजिक-सांस्कृतिक ओळख व्यक्त करतात. ही परंपरा दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये, कोयिलम्मा किंवा अरावन उत्सवादरम्यान पाळली जाते
ही प्रथा प्रतीकात्मक आहे आणि ती फक्त एका दिवासासाठी केली जाते. यात प्रत्यक्ष वैवाहित संबंध गुंतलेले नसतात. इरावनच्या स्मरणार्थ विधवा होऊन शोक व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे, असे धार्मिक विद्वानांचे म्हणणे आहे