सुंदर ठिकाणी कुठे फिरायचं म्हटलं की, आपल्याला परदेशी ठिकाणांची नावे आठवू लागतात. यातही मालदीव हे ठिकाण सर्वांच्या बकेट लिस्टमधलं आवडीचं ठिकाण. पण मालदीवला जायचं म्हटलं की, खिसा थोटा मोठाच करावा लागणार ... अशात तुम्हाला माहिती आहे का? भारतातच राजस्थान शहरात एक सुंदर वसलं आहे जिथे जाताच तुम्हाला त्या ठिकाणाची भुरळ पडेल. राजस्थान शहर त्याच्या समृद्ध आणि मनोरंजक संस्कृतीसाठी ओळखले जाते.
पृथ्वीवरील स्वर्गच जणू...! लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही... राजस्थानचे हे 'डम्पिंग यार्ड' पाहाल तर मालदीव पण विसराल (फोटो सौजन्य: Pinterest)
राजस्थान राज्यात जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि अलवर अशी अनेक ठिकाणे आपल्या ऐतिहसिक वारशासाठी ओळखली जातात पण राजस्थान फक्त इतकेच मर्यादित नाही तर इथे माऊंट अबू नावाचे अद्वितीय हिल स्टेशन देखील आहे
या ठिकाणचे धबधबे, गुहा, टेकड्या आणि नद्या या शहराच्या वैभवात आणखीनच भर घालतात. पण राजस्थान इतकेच मर्यादित नाही
लाखो रुपये खर्च करुन मालदीवसारख्या ठिकाणी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांनी राजस्थानमधील या अनोख्या ठिकाणाला भेट द्यायला हवी. किशनगड येथे वसलेल्या या ठिकाणाला राजस्थानचे मिनी मालदीव म्हटले जाते
असंख्य पर्वतांनी वेढलेले आणि "मून लँड ऑफ राजस्थान " म्हणून देखील ओळखले जाणारे हे ठिकाण मागील काही काळापासून पांढऱ्या पठारात रूपांतरित झाले आहे, याचे हे सुंदर रुप पर्यटकांनाच नाही तर फोटोग्राफर्सनाही याकडे आकर्षिक करते
राजस्थानचा हा परीसर किशनगड डंपिक ग्राउंड म्हणून ओळखला जातो. जेव्हा किशनगडच्या रहिवाशांना साचलेल्या कचऱ्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या तेव्हा त्यांनी कचरा साफ करण्यासाठी एक संगमरवरी क्षेत्र निर्माण केले. संध्याकाळी इथे फार सुंदर वातावरण बनते.
या ठिकाणाच्या आत जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घेणे आवश्यक आहे. डंपिक यार्डपासून ते फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि पास आवश्यक असेल. पास मिळवण्यासाठी तुम्हाला काही फाॅर्म भरुन द्यावे लागतील. यार्डमध्ये प्रवेश मोफत आहे, फक्त तुम्हाला परवानगीची आवश्यकता आहे.