कोकण म्हणजे स्वर्ग. कोकणातील खाद्य संस्कृती, निसर्ग सगळ्यांचं भूरळ घालतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात येतात. कोकणी खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. कमीत कमी साहित्यात बनवलले रुचकर जेवण चवीला अतिशय सुंदर लागते. कोकणात अनेक पारंपरिक पद्धतीने पदार्थ बनवले जातात. ओलं खोबर, गरम मसाले, कोकम इत्यादी पदार्थांचा वापर करून चविष्ट जेवण बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ केवळ कोकणातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
कोकणातील 'हे' पारंपरिक पदार्थ जगभरात आहेत फेमस
कोकणात सकाळच्या नाश्त्यात घावणे हा पदार्थ बनवला जातो. सकाळच्या नाश्त्याची सुरुवात घावणे खाल्यानंतर होते. तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून बनवलेला अतिशय सोपा पदार्थ म्हणजे घावणे. घावण्यांसोबत कोरा चहा किंवा चटणी तुम्ही खाऊ शकता.
मागील अनेक वर्षांपासून कोकणात पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे धोंडास. काकडीच्या गरापासून धोंडास बनवले जाते. खोबरं, तूप, काकडी घालून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय रुचकर लागतो.
नारळाचा रस आणि शिरवाळे हा पदार्थ कोकणी माणसांच्या कायमच ओठांवर असतो. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा नाश्त्यात रसातले शिरवाळे खाल्ले जातात. तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेल्या शेवया नारळाच्या दुधासोबत खाल्ल्या जातात.
संपूर्ण महाराष्ट्राचे अतिशय आवडते पेय म्हणजे सोलकढी. जेवणात जर सोलकढी नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. ओल्या खोबऱ्याचा रस आणि कोकम सरबत वापरून बनवलेला पदार्थ अतिशय सुंदर लागतो.
कोकणात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणात मासे किंवा चिकन वडे बनवले जातात. चिकन वडे आणि सोलकढी अतिशय रुचकर लागते. कोकणात गेल्यानंतर सोलकढी, चिकन वडे, रसातल्या शेवया इत्यादी पदार्थ नक्कीच ट्राय करा.