भारतीय जेवणात भात हा पदार्थ कायमच बनवला जातो. भाताशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर पोटही भरत नाही. भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्य घालून बनवलेला पौष्टिक पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी ठरतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भातापासून कोणते वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. (फोटो सौजन्य – istock)
भाताच्या 'या' पदार्थांनी थाळी बनवा आकर्षक आणि खास

वेगवेगळ्या भाज्या आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून बनवलेला व्हेज पुलाव चवीला अतिशय सुंदर लागतो. घरातील सगळ्यांचं व्हेज पुलाव खायला खूप जास्त आवडते.

काश्मिरी पुलाव मेवा, केशर आणि सौम्य मसाल्यांचा वापर करून बनवला जातो. पुलावची चव वाढवण्यासाठी त्यात केशर काड्या टाकल्या जातात. काश्मिरी पुलावची चव काहीशी गोड असते.

दक्षिण भारतातील अतिशय फेमस पदार्थ म्हणजे लेमन राईस. लिंबाचा रस आणि लिंबाच्या सालीचा वापर करून बनवलेला लेमन राईस चवीला अतिशय सुंदर लागतो.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जिरा राईस आणि डाळ फ्राय. या पदार्थांशिवाय जेवणाची चव लागत नाही. जिरा राईस चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे. कारण जिऱ्याचे सेवन केल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.

कोळंबी पुलाव सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मोठ्या आकाराच्या कोळंबी माशाचा वापर करून हा पदार्थ बनवला जातो. कोळंबी पुलावची चव वाढवण्यासाठी कोशिंबीर खाल्ली जाते.






