Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर
Oppo ने त्यांच्या सॉफ्टवेअर अपडेट पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, त्यांच्या काही स्मार्टफोन्सना आधीपेक्षा जास्त सॉफ्टवेयर अपडेट्स मिळणार आहेत. कंपनीच्या काही निवडक स्मार्टफोन्सना आता 5 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स मिळणार आहेत. Oppo Find X8 स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यासाठी 5 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स जारी केले जाणार आहेत. कंपनी आता त्यांची ही पॉलिसी इतर स्मार्टफोन्ससाठी देखील सुरु करण्याचा विचार करत आहे. येथे आम्ही तुमच्यासोबत ओप्पोच्या या स्मार्टफोन्सची यादी शेअर करत आहोत, ज्यांना 5 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील.
ओप्पोने कन्फर्म केलं आहे की, लिस्टमध्ये दिलेल्या स्मार्टफोन्सना आता 5 वर्षांसाठी अँड्रॉईड अपडेट्स मिळणार आहेत. यासोबतच या स्मार्टफोन्सना 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स देखील मिळणार आहे. कंपनीने Find X8 आणि X8 Pro स्मार्टफोन्सला गेल्यावर्षी Android 15 सह मार्केटमध्ये लाँच केले होते. यावर्षी कंपनी अँड्रॉईड 16 सह Find X9 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. Find X9 सीरीज स्मार्टफोन्सना Android 21 पर्यंत आणि Find X8 सीरीजमधील स्मार्टफोन्सना Android 20 पर्यंत अपडेट्स दिले जातील. (फोटो सौजन्य – Pinterest)
काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोनना देखील अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. मात्र ओप्पोने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. मात्र जर असे झाले तर ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनला 5 अँड्रॉइड अपडेट्स देखील मिळतील.
Oppo त्यांच्या लेटेस्ट अपडेट पॉलिसीसह आता त्या अँड्रॉईड कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे, जे 5 वर्षांसाठी त्यांच्या स्मार्टफोन्सना अँड्रॉईड अपडेट्स ऑफर करतात. OnePlus, Realme आणि Vivo सारखे स्मार्टफोन ब्रँड चार OS अपडेट देतात. तर Samsung आणि Google सारख्या कंपन्या 7 अपडेट देतात. Oppo ने अलीकडेच ColorOS 16 सादर केले, जे Android 16 वर आधारित सॉफ्टवेअर आहे.
Oppo कंपनी कोणत्या देशाची आहे?
Oppo ही चीनमधील BBK Electronics Group अंतर्गत येणारी स्मार्टफोन कंपनी आहे. OnePlus, Realme आणि Vivo या ब्रँड्सचेही तीच मूळ कंपनी आहे.
Oppo फोनला किती वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट मिळतात?
नव्या Oppo पॉलिसीनुसार, निवडक प्रीमियम मॉडेल्सना 5 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स दिले जातात.
Oppo सर्व्हिस सेंटर भारतात कुठे आहेत?
Oppo चे 2000 पेक्षा जास्त अधिकृत सर्व्हिस सेंटर भारतातील विविध शहरांमध्ये आहेत. युजर्स Oppo वेबसाइटवर “Service Center Locator” वापरून जवळचे सेंटर शोधू शकतात.






