मित्रमैत्रणी आणि नातेवाइकांसोबत दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी घरात फराळ, मिठाई आणि गोडचे इतर अनेक पदार्थ बनवले जातात. पण राज्यासह देशभरात सगळीकडे उष्णता वाढली आहे. कडक ऊन आणि सततच्या उष्णतेमुळे जीव हैराण होऊन जातो. अशावेळी घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही थंड पेय बनवू शकता. थंड पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय काहींना काही वारंवार मद्यपान करण्याची सवय असते. पण या सर्व पेयांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा अल्कोहोल-मुक्त हेल्दी पेय
डाळिंबाचा रस शरीरासाठी कायमच प्रभावी ठरतो. मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे टाकून रस काढून घ्या. त्यानंतर त्यात साखर, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. या पद्धतीने बनवलेला डाळिंबाचा रस शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यास मदत करेल.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये मसाला ताक कायमच प्यायले जाते. मसाला ताक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरते. यामुळे पोटात वाढलेली उष्णता, जळजळ कमी होते.
रंगीत गुलाबी फालुदा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. गुलाबाच्या पाकळ्यांचे सिरप, शेवया, रबडी इत्यादी पदार्थांपासून बनवलेला फालुदा चवीला अतिशय सुंदर लागतो.
शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी किवी मिंट कुलरचे सेवन करावे. किवींचा रस बनवण्यासाठी किवी मॅश करून त्यात पुदिन्याची पाने, साखर सिरप इत्यादी पदार्थ टाकून सरबत बनवून घ्यावे.
खजूर खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही खजूर केळीचा शेक बनवू शकता. शेक प्यायल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते.