अनेकदा घरी जेवणात चपात्या आवर्जून बनवल्या जातात. या चपात्या कमी पडू नयेत म्हणून आपण काही एक्सट्राच्या चपात्या बनवतो मात्र या चपात्या उरल्या की दुसऱ्या दिवशी यांच काय करावं ते आपल्याला सुचत नाही. अनेकांना शिळ्या चपात्या खायला फारशा आवडत नाहीत आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी शिळ्या आणि उरलेल्या चपात्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या काही लज्जतदार आणि हटके पदार्थांची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा मुलांच्या टिफीनसाठी बनवून त्यांना खाऊ घालू शकता. आम्हाला खात्री आहे की या पदार्थांची चव नक्कीच तुम्हाला या रेसिपीज पुन्हा ट्राय करण्यास भाग पाडेल.
शिळ्या पोळ्या फेकू नका; यांपासून तयार करा हे हटके टेस्टी पदार्थ; चव अशी की बोटं चाटत रहाल
शिळ्या उरलेल्या चपात्यांपासून तुम्ही टेस्टी रॅप तयार करु शकता. यासाठी पोळीवर तुमच्या आवडीचा साॅस लावून घ्या. त्यानंतर यावर कांदा, काकडी, गाजराचे तुकडे आणि एक चीज स्लाईस टाका. मग यावर उरलेली कोणतीही भाजी पसरवा आणि रॅपप्रमाणे याला गुंडाळून घ्या. तव्यावर हा रॅप तेल अथवा तूप लावून खरपूस भाजून घ्या.
आता शिळ्या चपातीची फ्रँकी तयार करण्यासाठी चपातीवर साॅस लावा. याच्या मधोमध बटाट्याची अथवा पनीरची स्टफींग भरा. वरुन थोडा चिरलेला कांदा आणि कोबी टाका आणि याला रोल करा. तयार रोल जरा तव्यावर शेका आणि सर्व्ह करा
चपातीचे नाचोज तुम्ही कधी खाल्ले नसावेत. यासाठी त्रिकोणी आकारात चपातीचे तुकडे करा आणि त्यांना तेल लावून बेक अथवा तळून घ्या. कुरकुरीत तुकड्यांवर आवडीचा साॅस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, चाट मसाला घालून खाण्यासाठी सर्व्ह करा
शिळ्या चपातीची भाजीदेखील बनवता येते, ज्यासाठी प्रथम चपातीचे तुकडे करा. पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो शिजवून घ्या. मग यात मीठ, मसाला, हळद आणि हलके पाणी टाकून साहित्या ढवळा. शेवटी यात चपातीचे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घालून परता
उरलेल्या चपातीपासून गोडसर लाडू तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये चपातीचे तुकडे टाकून बारीक वाटून घ्या. मग या चपीतीच्या चुऱ्यात किसलेला गूळ, वेलची पूड आणि थोडेसे तूप मिसळून लाडू वळून घ्या