7 जूनला भारतामध्ये बकरी ईद, जो ईद-उल-अधाचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी बकरी ईद इस्लामिक कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या झुल-हिज्जाच्या दहाव्या दिवशी साजरा केली जाते. इस्लाम धर्मीय लोकांसाठी बकरी ईद सण अतिशय खास आहे. यादिवशी एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे जून महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नेमकं काय द्यावं? हा पप्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ही खास पेय बनवू शकता. यामुळे उन्हाळातून आल्यानंतर फ्रेश आणि ताजेतवाने वाटेल. (फोटो सौजन्य – pinterest)
बकरी ईद निमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा 'ही' खास पेय
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बनवले जाणारे मोहब्बत सरबत सगळ्यांचं खूप आवडते. कलिंगड आणि दुधाचा वापर करून बनवलेले पेय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही घरी कलिंगडचे थंडगार पेय किंवा मोजितो बनवू शकता. मोजितो बनताना त्यात पुदिन्याचा वापर करावा.
उन्हाळ्यात प्रामुख्याने शिकंजी पेय बनवले जाते. पाण्यात लिंबू, काळे मीठ आणि साखर मिसळून बनवलेले पेय चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय तुम्ही यात सोडा सुद्धा टाकू शकता.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लस्सी प्यायला खूप आवडते. त्यामुळे नेहमीच दह्याची लस्सी बनवण्याऐवजी मँगो लस्सी पाहुण्यांसाठी बनवू शकता.
कडक उन्हातून घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही कच्च्या आंब्याचं पन्ह बनवू शकता. चवीला आंबटगोड लागणारे पेय सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.