पावसाळा आला की सुरु होतात ते आजारपण. वातावरणात होणारे बदल म्हणजेच मध्येच ऊन मध्येच पाऊस यामुळे हवेतील जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो. परिणाम सर्दी खोकला आणि ताप यांची साथ पसरायला वेळ लागत नाही. अनेकदा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊनही ताप आणि सर्दी पूर्णपणे जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला सतत हा त्रास जाणवत असल्यास स्वयंपाक घरातील मसाले घरचा वैद्य म्हणून काम करतात.
हळद : हळद जंतू नाशक असून आयुर्देवात हळदीला मोठं महत्त्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हळदीचं सेवन गुणकारी ठरतं. रोज सकाळी हळदीचं दूध प्यायल्यास अनेक आजार दूर होतात.
लवंग :पावसाळ्यात तापाची साथ मोठ्या प्रमाणात वाढते. ताप खूप जास्त येत असल्यास लवंगाचा काढा करुन प्यायल्यास काही तासातच ताप उतरतो. लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल मोठ्या प्रमाणात असतात.
जीरं: अनेकदा पावसाळ्यात पचनसंस्था बिघडते. पोटाच्या वारंवार तक्रारी जाणवतात. त्यामुळे जेवणानंतर जीरं खाणं किंवा सकाळी जीऱ्याचं पाणी पिण्यानं पोटाचं आरोग्य सुधारतं.
काळी मिरी : काळी मिरी शरीरात उष्णता निर्माण करते. पावसाळ्यात बाहेरील वातावरणात अतिरिक्त थंडावा असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास काळ्या मिरीचा काढा योग्य प्रमाणात घेणं फायदेशीर आहे.
आलं : जेवणात आल्याचा समावेश असणं. आल्याचा रस किंवा आल्याचा चहा प्य़ायल्याने सर्दी आण खोकला कमी होण्यास मदत होते.