भारताच्या संघाचा मालिकेचा शेवटचा कसोटी सामना सध्या सुरु आहे, टीम इंडीया सध्या इंग्लडविरुद्ध ओव्हल मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिनी कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भारताच्या संघाला अडचणीतुन काढले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने संघासाठी दुसऱ्या इंनिगमध्ये ४ विकेट्स घेतले आहेत त्यानंतर तो आता या मालिकेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आला आहे.
फोटो सौजन्य – सोशल मिडीया
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात त्याने इंग्लंडच्या ४ फलंदाजांच्या बळी घेतल्या. या मालिकेत त्याच्या एकूण बळींची संख्या १८ झाली आहे. त्याने बेन स्टोक्सला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
खांद्याच्या दुखापतीमुळे पाचवी कसोटी खेळत नसलेला इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्सने या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत. सध्याच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टोंग १५ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ओव्हल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तो खूप चांगली गोलंदाजी करत आहे. जर त्याने अशीच गोलंदाजी सुरू ठेवली तर तो इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनू शकतो. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत फक्त तीन सामने खेळला, परंतु तरीही त्याचे नाव सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-५ गोलंदाजांमध्ये आहे. बुमराहने या मालिकेत १४ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो चौथ्या स्थानावर आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
या टॉप-५ गोलंदाजांच्या यादीत आकाशदीप हा तिसरा भारतीय आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत १२ विकेट्स घेतल्या आहेत आणि तो बुमराहनंतर ५ व्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया