Municipal Elections 2026 : बीएमसी निवडणुकीसाठी मतदान सुरू असून आज (15) सकाळपासूनच मतदार मतदान करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वसामान्यांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
राजकीय क्षेत्रातील 'या' दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO

अखेर, चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, मुंबईकर गुरुवारी त्यांचे नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करत आहेत. २२७ बीएमसी जागांसाठी एकूण १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत १ कोटी ३ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मातोश्री यांच्यासह ते नागपुरात दाखल झाले होते. नागपूरमधील धरमपेठ परिसरातील झोन क्रमांक 2 मधील प्रभाग क्रमांक 15 येथील आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत मतदान केलं. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे आणि मुलगा खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "मला सकाळपासून विविध ठिकाणांहून फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नाव वगळली जात आहेत, काही ठिकाणी शाई पुसली जात आहे."

राज ठाकरेंनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग दर्शविला. यावेळी त्यांनी नागरिकांना देखील मतदान करून आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले. राजकीय क्षेत्रात या सहभागामुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut), खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही आज केंद्रावर जाऊन मतदान केले.






