नर्गिस फाखरी ही अमेरिकेतील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पण तिने भारतात येऊन आपल्या कामाची सुरुवात एकादी उत्तमरित्या केली. बॉलीवूडमधील तिचा पहिला चित्रपट रॉकस्टार हा होता. या चित्रपटामधून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात ती मुख्यभूमीकेत असून तिने रणवीर कपूरसोबत स्क्रीन शेअर जाताना दिसली होती. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपट करून त्या चित्रपटांनी चित्रपटगृहात चांगली कमाई केली. आता सध्या ती तिच्या कामाच्या कारकिर्दीमुळे सोशल मीडियावर सक्रिय असताना दिसत आहे.
नर्गिस फाखरीने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्रामहँडल वर शेअर केले आहे, हे फोटोज तिने, ‘ग्रीस पृथ्वीवरील स्वर्ग’ या कॅप्शनसह तिने हे फोटोज शेअर केला आहे.
या फोटोज मध्ये ती या ग्रीस देशातील वेगवेगळ्या ठिकाणाचा आनंद लुटताना दिसत आहे. ती सगळ्या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत असून, ती या देशातमध्ये हॅलीकॅप्टरने फिरत आहे.
ग्रीस या शहरात ती फिरत असताना तिने तेथील पदार्थांचासुद्धा आस्वाद घेतला आहे. ती या देशात भरपूर एन्जॉय हेच या फोटोज मधून स्पष्ट होत आहे.
नर्गिस हि अभिनेत्री म्हणून तर प्रसिद्ध आहेच पण, तिची ड्रेससिंग स्टाईल पाहून चाहते वेडे होत्यात. ग्रीसमध्ये सुद्धा ती वेगवेगळ्या पोशाखात दिसत आहे.
नर्गिस ने शेअर केलेल्या एका फोटो मध्ये ती बाथ रोब टॉवेल मध्ये एका पूलच्या बाजूला बसलेली आहे, सोबतच तिने स्वतःच्या बाजूला काही फळे ठेवून हे फोटोज काढले आहेत.
नर्गिस सोशल मीडियावर चाहत्यांचे नेहमी तिचे फोटोज, व्हिडिओ शेअर करून मनोरंजन करताना दिसत असते. त्याचदरम्यान ती लवकरच नवनवीन प्रोजेक्टस मध्ये ती प्रेक्षकांना दिसेल यात शंकाच नाही.