अभिनेता निखिल राजेशिर्के आणि त्याची पत्नी चैत्राली मोरे, लवकरच नव्या पाहुण्याचे स्वागत करण्याच्या तयारीत आहे. निखिलने आनंदाची बातमी दिली आहे. निखिल लवकरच बाबा होणार आहे आणि चैत्रालीला मातृसुख मिळणार आहे. याची माहिती स्वतः निखिलने दिली आहे. निखिलने त्याच्या पत्नीसह गोड अंदाजात फोटो पोस्ट केला आहे.
लक्ष्मीनिवास मालिका फेम निखिल राजेशिर्के लवकरच होणार बाबा! (फोटो सौजन्य - Social Media)

निखिल राजेशिर्केने केलेल्या या पोस्टमध्ये स्वतः अभिनेता निखिल दिसून येत आहेत. तसेच त्याची पत्नी (with baby pump) दिसून येत आहे. या पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'From “We do” to "We are due"' असे नमूद केले आहे.

नुकताच चैत्रालीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. गजऱ्याचे सुंदर आभूषण आणि पोपटी रंगाच्या साडीचा Look आकर्षक दिसत आहे.

या कार्यक्रमात निखिलने पारंपरीक कुरता आणि जाकीट परिधान केले आहे. दोघांना मराठी TV क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आल्या आहेत आणि अभिनंदन होत आहे.

अभिनेता निखिल राजेशिर्केसध्या लक्ष्मीनिवास मालिकेत 'भावना'च्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे. त्याने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये कामे केली आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ', 'रंग माझा वेगळा' तसेच 'अजूनही बरसात आहे' या मालिकांमध्येही निखिल दिसून आला होता.






