RR Vs PBKS Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
श्रेयस अय्यर विरुद्ध जोफरा आर्चरमध्ये रंगणार सामना
वैभव सूर्यवंशी- प्रभसिमरन सिंहच्या कामगिरीकडे लक्ष
संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार
Tata IPL 2026 PBKS Vs RR Live Updates: आज चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. प्ले ऑफमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. खेळपट्टीचा अंदाज पाहिला असता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान आता दोन्ही संघामधील (IPL 2026) हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.
हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो?
आज पंजाब किंग्ज अन् राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ 2008 पासून आतापर्यंत एकूण 30 वेळेस आमनेसामने आले आहेत. तर यामध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 17 तर आणि पंजाब किंग्जने 13 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ मजबूत दिसून येत आहे.
सध्या आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ चौथ्या तर पंजाब किंग्जचा संघ पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही मजबूत आणि बलढ्या संघांमध्ये होणार आहे. रोमांचक सामना आज पाहायला मिळू शकतो. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आज वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांच्या खेळीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी फायदा असला तरी देखील, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना या ठिकाणी मदत मिळू शकते आकडेवारीनुसार या मैदानात फिरकीपटूंच्या गोलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
काय आहे पीच रिपोर्ट?
चंदीगडची खेळपट्टी यंदाच्या हंगामात फलंदाजांसाठी अत्यंत पूरक ठरली आहे. 2026 च्या आयपीएलमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 211 इतकी आहे. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स आणि वेग असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. आजच्या सामन्यातही 180 ते 200 पेक्षा जास्त रन्सचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.
RR Vs PBKS Pitch Report: रियान पराग ‘अजिंक्य’ पंजाबला रोखणार? काय सांगतो पीच रिपोर्ट?
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, मार्को जानसन, विजयकुमार वैसाख, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा , रवी बिश्नोई.






