बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात. जांभळ्या रंगाच्या वाग्यांपासून भरीत, भजी किंवा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण काहींच्या आरोग्यासाठी वांगी अतिशय घातक ठरतात. वांगी खाल्यामुळे शरीरात गॅस तयार होतो. याशिवाय अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतर गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी वांग्याचे अजिबात सेवन करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात वांग्याचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'या' आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही करू नका वांग्याचे सेवन
संधिवाताच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी वांग्याचे सेवन अजिबात करू नये. वांग्यामध्ये 'सोलानाइन' नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि सांधे आणखीनच दुखतात.
मूळव्याध झाल्यानंतर वांगी किंवा बिया असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. वांगी खाल्यामुळे मूळव्याध आणखीनच वाढतो आणि शरीरात उष्णता वाढू लागते. याशिवाय खाज सुटणे आणि जळजळ वाढते.
आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे मूत्रपिंडात खडे वाढतात. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात वारंवार वेदना होतात. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यानंतर वांगी अजिबात खाऊ नये.
अपचन, गॅस किंवा पित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी वांग्याचे अजिबात सेवन करू नका. वांगी खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. याशिवाय अपचन झाल्यामुळे सतत उलट्या किंवा मळमळ होते.
अनेकांना वांगी खाल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे किंवा लालसरपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यास अजिबात वांगी खाऊ नये.