मधूमेह असणाऱ्या रुग्णांना फार जबाबदार राहावे लागते. अनेक पथ्य पाळावे लागतात. त्यांचे आयुष्य पथ्यावर असते. अशा वेळी त्यांनी काही खाद्य पदार्थ, मुख्यतः प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यातील एक म्हणजे इन्स्टंट नूडल्स. इन्स्टंट नूडल्समध्ये रिफाइंड पीठ आणि सोडियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रक्तातील साखर वाढते आणि पचनसंस्थेवरही ताण येतो. अशा पदार्थांच्या वारंवार सेवनाने आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात.
फोटो सौजन्य - Social Media
साखरेचे ब्रेकफास्ट सीरिअल्स टाळावेत. ब्रेकफास्ट सीरिअल्समध्ये साखर आणि कृत्रिम घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. फायबरच्या कमतरतेमुळे याचा पचनावरही विपरीत परिणाम होतो.
पांढरा ब्रेड आणि पॅकेज्ड बेकरी पदार्थ खाणे टाळावे. पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर कमी असल्यामुळे साखर नियंत्रणात राहत नाही. पॅकेज्ड बेकरी पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि साखर जास्त असते. यामुळे वजन वाढते आणि रक्तातील साखरेवर विपरीत परिणाम होतो.
साखरेचे पेय तसेच फळांचे जूस पिणे टाळावे. साखरेचे पेय आणि फळांचे जूस ग्लुकोज वाढवणारे ठरतात. या पेयांमध्ये फायबर नसल्यामुळे रक्तातील साखरेवर लगेच परिणाम होतो. यामुळे लांब पल्ल्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
फ्रोझन डिनर आणि रेडी-टू-ईट पदार्थ यापासून दूर राहावे. या पदार्थांमध्ये साखर, सोडियम आणि कृत्रिम घटक जास्त प्रमाणात असतात. हे पदार्थ आरोग्याला पोषक नसून ते हृदय आणि किडनीवर ताण देतात. यामुळे डायबिटीस नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
चिप्स आणि स्नॅक्स खाणे टाळावेत. चिप्समध्ये रिफाइंड तेल, मीठ आणि कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असते. हे स्नॅक्स रक्तातील साखर वाढवून वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी अशा पदार्थांपासून लांब राहणे गरजेचे आहे.