Reduce Belly Fat Remedies: जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर भोपळ्याच्या बिया तुमच्या आहारात एक उत्तम ॲड-ऑन असू शकतात. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया केवळ स्वादिष्टच नसतात, तर त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक फॅटी अॅसिड देखील असतात. यामध्ये कमी कॅलरीज असतात तसेच पौष्टिक घटकांचे उत्कृष्ट मिश्रण असते, जे वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या आहारात भाजलेल्या भोपळ्याच्या बियांचा समावेश कसा करू शकता, डाएटिशियन निखिल वत्स यांनी सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य - iStock)
भाजलेल्या भोपळ्याच्या बिया हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे जो तुम्ही कधीही खाऊ शकता. तुम्हाला वारंवार भूक लागत असल्यास, चिप्स किंवा इतर जंक फूडऐवजी भोपळ्याच्या बिया खाव्यात
भोपळ्याच्या बिया फायबर आणि प्रथिने समृद्ध आहेत. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अनहेल्दी स्नॅकिंग टाळण्यास मदत होते, तसंच या चविष्टही लागतात
जर तुम्हाला सलाड पौष्टिक आणि क्रंची बनवायचे असेल तर त्यात भाजलेल्या भोपळ्याच्या बिया मिक्स करा. यामुळे तुमच्या सॅलडची चव आणि पौष्टिक मूल्य दोन्ही वाढेल. या बिया प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. यामुळे वजन कमी करताना स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात
वजन कमी करण्यासाठी स्मूदी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या स्मूदीमध्ये एक चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया मिक्स करू शकता. स्मूदीतील भोपळ्याच्या बिया अधिक पोषण देतील तसेच तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही
सकाळच्या नाश्त्यात ओट्स किंवा दही खाण्याची तुमची सवय असेल तर त्यात भाजलेले भोपळ्याचे दाणे टाकल्याने तुमचा आहार आणखी निरोगी होऊ शकतो. यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी तर मिळेलच पण चयापचय क्रियाही वाढेल
जर तुम्हाला तुमच्या सूप किंवा सँडविचला हेल्दी ट्विस्ट द्यायचा असेल तर भाजलेल्या भोपळ्याच्या बिया वापरा. हे हेल्दी टॉपिंग म्हणून काम करेल आणि वजन कमी करण्यातही मदत करेल