रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan 2022) निमित्ताने ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत कोपरगाव शहरातील नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी आपल्या हाताने राख्या बनवल्या आहेत. यामध्ये उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी यांच्या सहकार्याने सगळ्या विद्यार्थिनी अहमदनगर (Ahmadnagar Rakshabandhan Celebration) सैनिकी कॅम्पमध्ये जवानांना राखी बांधणार आहेत.