नितेश तिवारी दिग्दर्शित ' रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. वारंवार चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातल्या स्टारकास्टची माहिती मिळताना दिसत आहे. चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून पहिला भाग दिवाळी २०२६ तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना आता अशातच सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टारकास्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
Ramayan Cast Revealed Ranbir Kapoor To Anil Kapoor Whos Playing What Find Out Now
रणबीर कपूर आणि साई पल्लवी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटाची शूटिंग सुरू असल्यापासून चाहत्यांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. एका इन्स्टाग्राम चॅनेलने कलाकारांची यादी देत ते कोणकोणती भूमिका साकारणार असल्याची माहिती दिली आहे, जाणून घेऊया....
नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरने प्रभू श्री रामाची भूमिका साकारली आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, रावणाच्या भूमिकेत टॉलिवूड अभिनेता यश तर रवी दुबे लक्ष्मण तर लारा दत्ता कैकयीची भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अनिल कपूर जनक राजाच्या भूमिकेत, बिग बी बच्चन जटायूच्या भूमिकेत, विक्रांत मेस्सी मेघनादच्या भूमिकेत तर मोहित रैना शिवाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काजल अग्रवाल मंडोदरी, रकुल प्रीत सिंग शुपर्णख, विवेक ओबेरॉय विद्युतजीव्हा ही भूमिका साकरणार आहे. तर दशरथाच्या भूमिकेत राम म्हणून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल दिसतील.
शीबा चढ्ढा मंथरा आणि इंदिरा क्रिष्णन कौशल्याची भूमिका साकारतील. 'रामायण' चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे राजा भरत ही भूमिका साकारणार आहे. तर कुणाल कपूर इंद्र देवाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.