लाल मिरची पावडर असलेले खाद्य पदार्थ खाण्यास जरी तिखट असेल तरी त्यांच्यामध्ये एक वेगळीच मज्जा असते. कारण हा मसाला जेवणाला तिखट आणि स्वादिष्ट करतो. पण हा मसाला प्रत्येकासाठी चांगला नाही. मुळात, काही समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी लाल मिरची पावडर अगदी विषासमान आहे.
या लोकांनी लाल मिरची पावडर खाणे टाळावे. (फोटो सौजन्य - Social Media)

जर पोटाचा त्रास असेल तर लाल मिरची पावडर खाणे टाळलेच उत्तम असते. लाल मिरची पावडर असलेले पदार्थ खाल्ल्याने गॅस तसेच एसिडिटीसारखी समस्या उदभवू शकतात.

लाल मिरची पावडरचे जास्त सेवन केल्याने आतड्यांना त्रास होतो. यात असलेल्या कैप्साइसिन या पदार्थामुळे आतड्यांना सूज येते तसेच आतडे दुखू लागतात.

जर तुम्हाला अगोदरच तोंड आले असेल तर या मसाल्यापासून लांब राहिलेलेच बरे! या मसाल्याचे सेवन केल्याने गळ्याच्या संबंधित त्रासही उदभवू शकतो.

लाल मिरची पावडर असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांचे दुखणे तसेच डोळ्यांमधून पाणी येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.

हृदयासंबंधित समस्या असणाऱ्या रुग्णांनी भुलूनही लाल मिरची पावडरचे सेवन करू नये. या रुग्णांसाठी लाल मिरची पावडर विषापेक्षा कमी नाही.






