गुलाबाचे फुल सौंदर्याचे प्रतीक मानेल जाते. याशिवाय गुलाबाच्या फुलाचा वापर आरोग्यासाठी सुद्धा केला जातो. गुलाबाच्या फुलामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, लोह आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद, गुलाब चहा, चॉकलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा गुलाबाच्या चहाचे सेवन
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरावर साचून राहिलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गुलाबाच्या चहाचे सेवन करावे.
गुलाबाच्या चहाचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. याशिवाय त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गुलाबाच्या चहाचे सेवन करावे.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात गुलाबाच्या चहाचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखी इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुलाबाच्या चहाचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गुलाबाच्या चहाचे सेवन करावे. गुलाबाच्या चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.