दैनंदिन जीवन जगताना उच्च रक्तदाब वाढणे अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पण नेहमीच उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय धोक्याचे आहे. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार वाढवतो. रक्तदाब वाढल्यानंतर हार्ट अटॅक येणे, स्ट्रोक किंवा किडनीच्या आजारांचे निदान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वारंवार शरीरात वाढणारा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
High blood pressure नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित करा 'या' ड्रिंक्सचे सेवन
सकाळी उठल्यानंतर नियमित एक नारळ पाणी प्यावे. यामध्ये नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स भरपूर आढळून येतात, ज्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम इत्यादी आवश्यक खनिजे असतात. उच्च रक्तदाब वाढू नये म्हणून नारळ पाणी प्यावे.
रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेले सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
जास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनवलेला चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. सकाळी उठल्यानंतर दुधाचं किंवा काळा चहा पिण्याऐवजी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा.
दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय दालचिनीच्या चहामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
कलिंगडाचा रस प्यायल्यामुळे शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय कलिंगडाचा रस प्यायल्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो.