तुम्ही कधी व्हेल माशाचे डोळे जवळून पाहिले आहेत का? नसेल तर या फोटोग्राफरचे काम तुम्हाला आश्चर्यचकित करेल. रेचेल मूर नावाच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने हंपबॅक व्हेलचे डोळ्यांची दृश्ये इतक्या सुंदरपणे कॅमेऱ्यात कैद केली आहे की ही आता छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यातील दृश्य तुम्हाला थक्क करतील.
Whale Eye's Closeup: डोळे आहेत की आकाशगंगा? व्हेल माशाच्या डोळ्यांचा क्लोज अप शॉट पाहिलात का?
जगातील सर्वात मोठ्या माशांपैकी असणाऱ्या हंपबॅक व्हेल माशाच्या डोळ्यातील दृश्ये एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत
व्हेल माशाच्या डोळ्यांचा हा क्लोज अप शॉट पाहून आता अनेक लोक थक्क झाले आहेत कारण त्याचे डोळे केवळ विशाल किंवा सुंदर नव्हते तर त्यांना त्यांच्यामध्ये एक 'आकाशगंगा' दिसत होती
प्रसिद्ध छायाचित्रकार रेचेल मूर यांनी 6 ऑक्टोबर 2024 रोजी ताहिती (Tahiti) जवळ एका मादी हंपबॅक व्हेलचे डोळे कॅमेऱ्यात सुंदरपणे टिपले. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये व्हेलच्या डोळ्यांची निळी चमक स्पष्टपणे दिसत आहे
व्हेल माशाच्या डोळ्यांची ही अद्भुत झलक रेचेलने आपल्या @moore_rachel नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या फोटोजना 1 लाख 6 हजार हजाराहून अधिक लोकांनी लाइक्स देऊन यावर आपली पसंती दर्शवली आहे
फोटो शेअर करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक लोकांनी फोटोजवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, "अविश्वसनीय शॉट" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "उल्लेखनीय आहे" आणखीन एकाने लिहिले आहे, "मी या वर्षी पाहिलेली सर्वोत्तम प्रतिमा"