पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भक्त खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे. याचबरोबर अनेक मराठी सेलिब्रिटी या वारीत दंग होताना दिसले. आता अश्यातच महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील या पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसली. लाखो विठ्ठलभक्तांच्या आनंदात दंग झाली. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे.
डोईवर तुळस घेऊन पंढरपूरच्या पाय वारीत दंग झाली महाराष्ट्राची आर्ची (फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने यावर्षी वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. तिने या क्षणाचा खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
कपाळी गंधक, हातात टाळ आणि पायात ठेका धरत रिंकूने वारीचा आनंद घेतला. पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर तुळस घेऊन ती पारंपरिक मराठमोळ्या रूपात दिसली आहे.
तसेच, अभिनेत्री वडिलांसोबत फुगडी खेळताना आणि इतर महिला वारकऱ्यांमध्ये मिसळून पारंपरिक खेळ खेळताना दिसली आहे. तिच्या आनंदात भक्तीची झलक स्पष्टपणे दिसते आहे.
रिंकूने तिच्या इंस्टाग्रामवर वारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि लिहिले, “जय जय राम कृष्ण हरी! मी वयाच्या 4 व्या वर्षी माझ्या बाबांसोबत वारीत गेले होते. आज तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तेच क्षण जगतेय... हे क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत.”
अभिनेत्रीचे व्हिडीओ आणि फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिचे कौतुक करत आहेत. 'तुझा साधेपणा मनाला भावला', 'तू खरी कलाकार आहेस, जमिनीवर पाय ठेवून चालणारी' अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रियांनी दिल्या आहेत.