सैराटमधून तुफान यश मिळविणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा साड्यांमधील फोटो शेअर करत असते. रिंकूने दिवाळीसाठी खास लुक शेअर केला आहे. गावातील वातावरण आणि कॉटनच्या साडीतील हा लुक चाहत्यांना भलताच आवडलाय. रिंकूची ही अदा तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करतेय. साधेपणातील सौंदर्य हा शब्द जणू काही रिंकूसाठीच आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पहा रिंकूचा हा सोबर आणि छानसा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रिंकूने निळ्या रंगाची आणि लाल काठाची अशी खणाची साडी नेसली आहे आणि तिचा हा सोबर लुक सर्वांनाच भावलाय
या साडीसह तिने लाल रंगाचा गोल्डन बॉर्डर असणारा ब्लाऊज परिधान केला आहे आणि त्यासह हातात गावातील बायकांसारख्या हिरव्या बांगड्या घातल्या आहेत
गळ्यात साधासा मोत्याचा नेकलेस आणि त्याला साजेसे कानातले रिंकून घातले आहेत आणि आपल्या हास्याने या लुकला चारचाँद लावले आहेत
अगदी सामान्य घरातील मुलींना आपालीशी वाटेल अशी हेअरस्टाईल करत रिंकूने शेतात फोटोशूट केले आहे आणि तिचा हा लुक कमालीचा सुंदर दिसतोय
गायीला पोळी (चपाती) भरवताना अगदी तिच्यातील साधेपणा आजही दिसून येतो. आपल्या मातीची नाळ जपणारी रिंकू चाहत्यांना अधिक आवडते
अगदी साधा मेकअप रिंकूने केला असून फाऊंडेशन, टिकली, काजळ, आयलायनर, ब्लश आणि लिपस्टिक लावत तिने लुक पूर्ण केलाय