पावसाळा आणि बहरणारा निसर्ग यांचं नातं घट्ट आहे. मात्र पावसाव्यतिरिक्त देखील वसंतात बहरणारा निसर्ग तुम्ही कधी पाहिलाय का ? जर तुम्हाला विविध ठिकाणी फिरायला आवडत असेल आणि तुम्ही सुद्धा निसर्गप्रेमी असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
गुलमर्ग ,कश्मीर : काश्मीरला बर्फामध्य फिरायला कोणाला नाही आवडत. मात्र वसंतात देखील काश्मीरचं सौैंदर्य भूरळ पाडतं. बर्फ हळूहळू वितळायला लागल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि किनारी असलेल्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेलेली बाग पाहणं निसर्गप्रेमींना कायम खुणावतं.
कूर्ग , कर्नाटक : कूर्गमध्ये कॉफीची लागवड प्रामुख्याने केली जाते. वसंत ऋतूत कॉफीच्या शेतीला बहर येतो. कॉफीच्या फुलांच्या सुगंधाने वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. त्यामुळे पर्य़टकांच्या आकर्षणाचा हा केंद्रबिंदू आहे.
उटी, तामिळनाडू: उटीला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारी जागा म्हणजे निलगिरी पर्वत. निळ्या रंगाचा डोंगर म्हणजे निलगिरी. या ठिकाणी वसंतात जंगल सफारी अनुभवणं स्वर्गसुखाचा अनुभव देतं.
श्रीनगर, काश्मीर : वसंतात सूर्याच्या किरणांनी चकाकणारा बर्फाचा डोंगर, विविध फुलांच्या बाग आणि बोटींग याचा अनुभव घ्यायला एकदातरी काश्मीरला जायलाच पाहिजे.
मुन्नार, केरळ : देवाची भूमी म्हणजे देवभूमी अशी केरळची ओळख आहे. केरळचं निसर्गसौंदर्य पावसाळ्या प्रमाणे वसंतातही मोहवणारं असतं.क्ष्यांचा किलबिलाट आणि बहरून आलेली वनश्री अनुभवण्यासाठी तुम्ही वसंतात केरळला फिरण्याचा प्लॅन करू शकता.
शिलाँग, मेघालय : मेघालयाचा बहुतांश भाग हा डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे. वसंतात शिलाँगमध्ये ऑर्किड फुलांचा बहर असतो. खास ही फुलं पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.