वाढलेले वजन कमी करताना बऱ्याचदा अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. कारण नाश्ता केल्यानंतर वजन वाढेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण असे काही नाही. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)
दिवसाची सुरुवात करा 'या' हेल्दी नाश्त्याने!
ग्रीक दह्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दह्यात तुम्ही मध, अक्रोड किंवा बदाम घालून खाऊ शकता. याशिवाय ग्रीक दह्यात फळे टाकून खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
मोड आलेली कडधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या कडधान्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. त्यामुळे कडधान्यांमध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या, टोमॅटो, लिंबू आणि इतर मसाले टाकून तुम्ही खाऊ शकता.
वाढलेले वजन कमी करताना फळांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही पपई, टरबूज, सफरचंद, डाळिंब, संत्री, केळी, किवी इत्यादी फळांचे सेवन करावे. फळे खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
मखाणा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही तुपामध्ये भाजलेले मखाणा खावे. याशिवाय यामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबरअसतात.
सकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळून येते. भाजलेले चणे खाल्यामुळे शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात.