राजभरात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. ऊन वाढल्यानंतर अंगातून घामाच्या धारा निघून लागतात. अशावेळी सर्वच महिला अतिशय आरामदायी कपडे परिधान करण्यास जास्त पसंती दर्शवतात. ऋतूंमध्ये बदल झाल्यानंतर कपड्यांमधील सुद्धा बदल केले जाते. उन्हाळाच्या दिवसांमध्ये कॉटनचे कपडे प्रामुख्याने घातले जातात. कॉटनचे कापड उन्हाळासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. या दिवसांमध्ये महिला साडी नेसल्यानंतर स्टयलिश स्लिव्ह्जलेस ब्लाऊज परिधान करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे काही सुंदर पार्टन्स सांगणार आहोत. या डिझाइन्सचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
उन्हाळ्यात साडीवर ट्राय करा स्टयलिश स्लिव्ह्जलेस ब्लाऊज!
पार्टी किंवा डिझायनर साड्यांवर तुम्ही या पद्धतीचे स्लिव्ह्जलेस ब्लाऊज शिवू शकता. यामुळे तुमचा लुक खूप स्टायलिश दिसेल.
ऑफिस किंवा इतर वेळी बाहेर जाताना तुम्ही या पद्धतीचे स्टयलिश स्लिव्ह्जलेस ब्लाऊज घालू शकता. यामुळे तुम्हाला चारचौघांमध्ये लाजिरवण्यासारखे वाटणार नाही.
काठपदर किंवा पैठणी साडी या डिझाइन्सचा स्लिव्ह्जलेस किंवा बॅकलेस ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल. यामुळे जास्त घाम येऊन कपडे खराब होणार नाहीत.
अनेक महिला खूप जास्त डीप स्लिव्ह्जलेस असलेले ब्लाऊज परिधान करायला खूप आवडतात. या डिझाईन्सच्या स्लिव्ह्जलेस ब्लाऊजवर तुम्ही कॉटन किंवा सिल्कची साडी नेसू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही स्टँड कॉलर आणि समोरच्या बाजुने डिप व्ही नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. या डिझाइन्सचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर दिसेल.