वेस्ट इंडीजचा स्टार क्रिकेट खेळाडू निकोलस पुरन याने त्याच्या 29 व्या वर्षात निवृतीची घोषणा करुन सर्वानाच धक्का दिला आहे. कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत निकोलस पूरनचे नाव समाविष्ट झाले आहे. या यादीत पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक अव्वल स्थानावर आहे. त्याने वयाच्या 27 व्या वर्षी निवृत्ती घेतली. क्रिकेटमध्ये कमी वयामध्ये कोणत्या खेळाडूंनी निवृती घेतली यासंदर्भात वाचा.
क्रिकेट विश्वामध्ये कमी वयात निवृती घेणारे खेळाडू. फोटो सौजन्य : X
सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर सकलेन मुश्ताक हा आहे. पाकिस्तानच्या या महान गोलंदाजाने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीचे कारण गुडघ्याचे आजार होते. फोटो सौजन्य : X
निकोलस पूरनने वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे, परंतु तो फक्त फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू इच्छितो. 160 हून अधिक सामने खेळल्यानंतर या वयात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून स्वतःला दूर करण्याचे हेच कारण आहे. फोटो सौजन्य : X
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकने त्याच्या वयाच्या तिसाव्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एक दिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा हा निर्णय म्हणजे जळजवळ क्रिकेटमधून लांब होणे यासारखाच आहे. फोटो सौजन्य : X
भारताचे स्टार 1983 विश्वचषक विजेते रवी शास्त्री यांचे नाव देखील लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे, ज्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. त्यांना गुडघ्याचाही त्रास होता, यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेले. फोटो सौजन्य : X
या यादीमध्ये इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफने वयाच्या ३१ व्या वर्षी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. गुडघा आणि पाठीच्या दुखण्यामुळे त्यालाही लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले. फोटो सौजन्य : X
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसनेही दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी तो फक्त ३२ वर्षांचा होता. त्यानंतर त्यानी पाकिस्तानच्या संघाला देखील कोचिंग दिली होती. फोटो सौजन्य : X
या यादीत हेनरिक क्लासेनचे नावही समाविष्ट झाले आहे. त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याला फ्रँचायझी क्रिकेटवरही लक्ष केंद्रित करायचे आहे. तो तंदुरुस्त आहे, पण तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे नाही. फोटो सौजन्य : X