भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये, वयाच्या अवघ्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित बॉलिवूडमध्ये एक बायोपिक चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटाने रिलीज होताच बराच वाद देखील निर्माण केला होता. जाणून घ्या सविस्तर.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बनलेला एकमेव चित्रपट, ज्याच्यामुळे राजकारणात उडाली होती खळबळ यामुळे राजकारणी भडकले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित हा बॉलिवूड चित्रपट 5 वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' आहे
Photo Credit- Social Media मनमोहन सिंगांची पी
या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर यांनी साकारली होती. चित्रपटातील त्यांच्या कामगिरीची खूप प्रशंसा करण्यात आली होती. अनेकांना त्यांचे चित्रपटातील हावभाव, बोलण्याची पद्धत हुबेहूब मनमोहन सिंगप्रमाणे वाटली
या चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका सुझान बर्नर्टने, राहुल गांधींची भूमिका अर्जुन माथूरने आणि प्रियंका गांधीची भूमिका आहाना कुमराने साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केले होते आणि सुनील बोहरा आणि धवन यांनी निर्मिती केली होती
या चित्रपटाचे एकूण बजेट 18 असून त्याने जगभरात 26.50 कोटींचे कलेक्शन केले. आता या चित्रपटाबद्दल एवढा गदारोळ का झाला याबद्दल बोलूया. यूपीएच्या कार्यकाळातील वाद हे त्यामागचे कारण होते
मनमोहन सिंग यांच्यावर सोनिया गांधींच्या सूचनेनुसार काम केल्याचा आरोप होता. हे या चित्रपटात दाखविण्यात आले होते, त्यावरून काँग्रेस पक्षाकडून जोरदार राडा देखील घालण्यात आला होता