हल्ली सर्वच नववधू लग्नातील लुक आणखीनच सुंदर आणि उठावदार करण्यासाठी सोन्याचे दागिने न घालता बाजारात उपलब्ध असलेले ब्रायडल ज्वेलरी सेट घालतात. गोल्ड, सिल्वर आणि मोती इत्यादी वेगवेगळे ब्रायडल सेट बाजारात उपलब्ध आहेत. पारंपरिक नक्षीकाम, नाजूक वर्क करून तयार केलेले दागिने घातले जातात. नऊवारी साडी किंवा लग्नातील रिसेप्शन लुकसाठी तुम्ही सुंदर सुंदर दागिन्यांची निवड करू शकता. ब्रायडल सेटचे कॉम्बो ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला सुंदर ब्रायडल सेट मिळेल. (फोटो सौजन्य – pinterest)
मराठमोळ्या दागिन्यांनी करा लग्नातील साजश्रृगांर, सेट असा करा की दिसाल सुंदर आणि क्लासी

काहींना पारंपरिक दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही नऊवारी साडीवर कोल्हापूरी साज परिधान करू शकता. नक्षीदार सोन्याच्या माळा परिधान करून फॅशनेबल लुक करू शकता.

कांजीवरम स्लिक किंवा इतर कोणत्याही स्लिक साड्या नेसण्यानंतर त्यावर टेम्पल ज्वेलरी घातल्यास तुम्ही अतिशय सुंदर आणि उठावदार दिसाल. कांजीवरम साडीवरील लुक लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सुंदर दिसेल.

हल्ली चंद्रकोर दागिने खूप जास्त ट्रेडींगला आहेत. त्यामुळे नऊवारी लुकवर तुम्ही चंद्रकोर असलेला ब्रायडल सेट घालून तुमचा लुक आणखीनच खुलवू शकता.

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत मोत्याच्या दागिन्यांनी महिला कायमच पसंती दर्शवतात. मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर आकर्षक आणि सुंदर दिसतात.

लग्नात काहींना टिपिकल पारंपरिक लुक हवा असतो. हा लुक करण्यासाठी नऊवारी साडीवर तुम्ही बोर माळ, गहू माळ किंवा इतर पारंपरिक दागिने घालू शकता.






