लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोल्ड ड्रिंक प्यायला खूप जास्त आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवडीने कोल्ड ड्रिंक प्यायले जाते.अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवल्यानंतर डोळ्यांसमोर येणारी गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक. पण वारंवार कोल्ड ड्रिंकचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. किंमतीने स्वस्त असलेले कोल्ड ड्रिंक आतड्यांचे नुकसान करतात. आज आम्ही तुम्हाला वारंवार कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे शरीराचे कोणते नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
आवडीने प्यायले जाणारे Cold Drink शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच आतड्यांचे होईल नुकसान

एका सामान्य ३०० मिलीलीटर सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीमध्ये अंदाजे ३५ ते ४० ग्रॅम साखर असते. ही साखर शरीरात ऊर्जा निर्माण न करता चरबीच्या स्वरूपात साठून राहते.

स्वस्त पेयांमध्ये अनेकदा उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते. याचा थेट परिणाम शरीरावर होतो. सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

शरीराच्या पेशी इन्सुलिनची संवेदनशीलता कमी झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. अशावेळी टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता असते. शरीरात रक्ताची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.

कोल्ड ड्रिंकमध्ये असलेले फॉस्फोरिक आम्ल शरीरातील कॅल्शियम बाहेर काढून टाकते. कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना वाढून गंभीर आजारांची लागण होते.

सोडामधील आम्ल दातांच्या बाहेरील थराला हानी पोहचवते. यामुळे दात कमकुवत होऊन सहज पडतात. तसेच कोल्ड ड्रिंक पिताना दातांमध्ये संवेदनशीलता वाढते.






