मनाला शांती मिळवून देण्यात किंवा आपले मन रमवण्यात, कामात उत्साह निर्माण करण्यात गाण्यांचा मोठा वाटा. फार पूर्वीपासून गाणी बनवली आणि ऐकली जात आहेत पण प्रत्येक गाणं प्रक्षकांना आवडेलच असं नाही. जुन्या काळात एक गाणं रिलीज झालं होत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हे बाॅलिवूडमधील पहिले वादग्रस्त गाणं होत, ज्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला होता.
3 मिनिट 26 सेकंदाचं ते वादग्रस्त गाणं, जे ऐकताच सर्वत्र माजला होता गोंधळ; भरपूर बाचाबाची झाली पण तरीही झालं फेमस!
बऱ्याचदा चित्रपट फेमस होत नाही त्याहून अनेक पटींनी चित्रपटातील गाणी फेमस होऊन जातात. असाच एक चित्रपट होता ज्याचे नाव 'शहनाई'. हा चित्रपट १९४७ साली रिलिज करण्यात आले असून गाण्याचे नाव 'आना मेरी जान संडे के संडे' असे होते.
गाण्यामध्ये अनेक नवीन बोल आणि संगीताचा वापर करण्यात आला होता पण लोकांनी हा बदल स्वीकारला नाही. या गाण्याचे सूर आणि पाश्चात्य संगीताचा आस्वाद प्रेक्षकांना आवडला पण लोकांचा असा विश्वास होता की हे गाणं अश्लिलता वाढवू शकते आणि ते भारतीय समाजासाठी चांगले नाही.
हे गाणं प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. माना कपूरसोबत त्यांनी ते गायले होते आणि पी. एल. संतोषी यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. गाण्याच्या कथेत गावाकडची मुलगी आणि परदेशी मुलगा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. गाण्याचा हा विषय त्याकाळी फार नवा होता ज्यामुळे प्रसिद्ध गाण्यांच्या चार्टमध्ये ते शीर्षस्थानी आले.
एवढंच काय तर लोकांनी या गाण्याला नैतिकतेच्या विरुद्ध असल्याचेही म्हटले, ज्यामुळे हा वाद आणखीनच वाढत गेला. मात्र १९९० च्या दशकात या गाण्याने पुन्हा एकदा एका नव्या रुपात एंट्री घेतली. 'खाना मेरी जान, मेरी जान मुर्गी के अंडे' या जाहिरातीच्या जिंगलमध्ये त्याचा वापर करण्यात आला. हे जिंगल सर्वांनाच फार आवडले आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले.
तुम्हाला जर हे गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही ते यूट्यूबवर ऐकू शकता. १८४७ साली रिलीज झालेलं हे गाणं त्याकाळचं सर्वाधिक कमाई करणारं गाणं होत. गाण्यामुळे चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दाखवला