कोणतीही गोष्ट खरेदी करायचं म्हटलं की, सर्वप्रथम आपण त्या वस्तूची किंमत पाहतो. अशातच आम्ही तुम्हाला सांगतो की, पृथ्वीवर अशा अनेक महागड्या गोष्टी आहेत, ज्यांची किंमत आपल्या कल्पनेपलिकडे आहे. यामध्ये दुर्मिळ धातू, नैसर्गिक घटक आणि अनेक वेगवेगळ्या माैल्यवान वस्तूंचा समावेश आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पृथ्वीवरील सर्वात महागड्या वस्तू; किमती वाचून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

'History Supreme' ही जगातील सर्वात महागडी नौका मानली जाते, याची किंमत सुमारे $४.८ अब्ज इतकी आहे. स्टुअर्ट ह्यूजेस नावाच्या डिझायनरने याला डिजाईन केले आहे आणि ते बनवण्यासाठी सोने, प्लॅटिनम आणि खऱ्या डायनासोरच्या हाडांचा वापर करण्यात आला आहे

यात मुकेश अंबानींच्या अँटिलियाचाही समावेश आहे, जे मुंबईतील अल्टामाउंट रोडवर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे हे घर आहे

१८९० च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेंच पोस्ट-इम्प्रेशनिस्ट चित्रकार पॉल सेझन यांनी तयार केलेली द कार्ड प्लेयर्स जगाताल सर्वात महागड्या कलाकृतींपैकी एक आहे. यात ग्रामीण लोक गंभीर आणि शांत स्थितीत पत्ते खेळताना दाखवण्यात आले आहे

हबल स्पेस टेलिस्कोप (HST) ही नासा आणि ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) यांनी संयुक्तपणे विकसित केलेली एक स्पेस टेलिस्कोप आहे, याचाही महागड्या गोष्टींच्या यादित समावेश करण्यात आला आहे. २४ एप्रिल १९९० रोजी स्पेस शटल डिस्कव्हरी (STS-31) द्वारे याला प्रक्षेपित करण्यात आले होते

मर्सिडीज-बेंझ ३०० एसएलआर (Sport Leicht Rennwagen) ही १९५५ मध्ये बनवलेली स्पोर्ट्स रेसिंग कार होती, जी त्या काळातील सर्वोत्तम आणि वेगवान कारपैकी एक मानली जात होती. हा जगातला सर्वात महाग आणि क्लासिक रेसिंग कार आहे






