विमानतळ ही एक अशी गोष्ट आहे जिथून वेगवेगळी विमाने हवेत उड्डाण घेतात किंवा हवेतून जमिनीवर उतरवली जातात. एकंदरीतच हे ठिकाण विमानांसाठीचा एक थांबा आहे. तुम्ही आजवर अनेक विमानतळांविषयी ऐकले असेल पण आज आम्ही तुम्हाला एका अशा विमानतळाची माहिती सांगणार आहोत जिथून विमानच काय तर ट्रेनही धावल्या जातात. विमानतळाच्या रनवेवर तुम्ही विमानांना धावताना पाहिलं असेल पण इथे तुम्हाला रनवेवर ट्रेनही धावताना दिसून येतील. चला या विमानतळाचे नाव काय आणि ते कुठे आहे ते जाणून घेऊया.
जगातील सर्वात विचित्र असं Airport जिथे रनवेवर धावते ट्रेन! नाव वाचाल तर अचंबित व्हाल

हे एक असे विमानतळ आहे जिथे रनवेवर विमान उडत असाताना त्याच ठिकाणाहून ट्रेनही धावली जाते. म्हणून, पायलटला ट्रेन लक्षात ठेवून उड्डाण करावे लागते. एकदा ट्रेन गेली की, पायलट पुन्हा उड्डाण घेतो.

न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील गिस्बोर्न येथे हे जगातील सर्वात अनोखे विमानतळ आढळून येते. इथे मेन रनवेवर ट्रेन धावताना दिसणे फार सामान्य गोष्ट आहे.

न्यूझीलंडच्या या विमानतळावरून जाणारी ट्रेन पामरस्टन नॉर्थ-गिसबोर्न रेल्वे मार्गाचा भाग आहे, जी धावपट्टीला दुभाजक करते. म्हणूनच कोणताही अपघात टाळण्यासाठी उड्डाण आणि ट्रेनचे वेळापत्रक काळजीपूर्वक व्यवस्थापित करावे लागते.

माहितीनुसार, इथे विमानतळ आणि रेल्वे दोन्ही एकाच वेळी सकाळी 6:30ते रात्री 8:30 या वेळेत चालतात, त्यामुळे एकाला दुसऱ्यासाठी थांबावे लागते. रनवेवरुन जाणाऱ्या गाड्यांना प्रथम उड्डाणासाठी परवानगी दिली जाते, त्यानंतर उड्डाणांना हिरवा कंदील दिला जातो.

एखादा विमान उड्डाणासाठी तयार असेल तर ट्रेनला यावेळी थांबा दिला जातो. धावपट्टी मोकळी होताच, ट्रेनला ताबडतोब रवाना करण्याच्या सूचना दिल्या जातात. निश्चितच यासाठी योग्य नियोजनाची नितांत आवश्यकता लागते.






