दैनंदिन आहारात नियमित एक तरी पालेभाजी खावी, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. नियमित पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. मेथी, मुळा, पालक, चवळी इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांचे कायमच सेवन केले जाते. त्यातील अनेकांना आवडणारी भाजी म्हणजे मुळा. मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. पण काहींच्या आरोग्यासाठी मुळा अतिशय घातक ठरतो. मुळा खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचते. (फोटो सौजन्य – istock)
आवडीने खाल्ला जाणारा मुळा 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक

मुळयामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील सोडियम बाहेर पडून जाते. सोडियमची पातळी कमी झाल्यानंतर रक्तदाब कमी होऊन जातो. रक्तदाब कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा येऊन चक्कर येण्याची शक्यता असते.

थायरॉईड असलेल्या रुग्णांनी कच्च्या मुळ्याच्या भाजीचे सेवन करू नये. मुळामध्ये गॉइट्रोजन नावाचा पदार्थ असतो, जो थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. यामुळे थायरॉईड वाढण्याची शक्यता असते.

मधुमेहाची औषध घेत असलेल्या रुग्णांनी मुळा खाऊ नये. यामुळे रक्तातील साखर आणखीनच कमी होऊन जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी मुळ्याचे सेवन करू नये.

मुळा पचनासाठी अतिशय जड असतो. यामुळे पोटात गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते. याशिवाय पित्ताशयातील खड्डे वाढून पोटात खूप जास्त वेदना होतात.

पित्ताशयात खड्डे झाल्यास मुळा खाऊ नये. यामुळे पित्त स्त्राव वाढतो. वाढत्या स्रावामुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे मुळ्याचे सेवन अतिप्रमाणात करू नये.






