सोनं चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून खूप मोठी वाढ होताना दिसून येत आहे. हल्ली सर्वच महिला सोन्याचे दागिने घालण्याऐवजी वेगवेगळे मोत्याचे किंवा कुंदनचे दागिने घालण्यास जास्त पसंती दर्शवतात. दागिने घातल्यामुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. लग्नात साडीवरील लुक आणखीनच खुलून दिसण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे आणि नक्षीकाम करून तयार केलेले ज्वेलरी सेट घातले जातात. साडीचा लुक दागिन्यांशिवाय पूर्ण होत नाही. साडीच्या रंगाशी आणि प्रकाराशी जुळणारे किंवा साडीला शोभून दिसणारे दागिने परिधान केल्यास अतिशय स्टायलिश आणि मॉर्डन लुक दिसतो. (फोटो सौजन्य – pinterest)
प्रत्येक महिलेवर शोभून दिसतील 'हे' आकर्षक आणि उठावदार ज्वेलरी सेट

मोत्याचे दागिने नऊवारी साडीसह पैठणी आणि काठपदर साडीवर अतिशय सुंदर दिसतात. गळ्यात मोत्याची चिंचपेटी, तन्मणी किंवा मोत्याची माळ घातल्यास लुक मराठमोळा दिसेल.

लेहेंगा किंवा रिसेप्शन साडीवर तुम्ही अमेरिकन डायमंड सेट घालू शकता. अमेरिकन डायमंड सेट कोणत्याही डिझायनर साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर दिसतो.

कॉटन, खादी, इकत किंवा हँडवर्क साड्यांवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट अतिशय उठावदार दिसतात. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट इतर कोणत्याही साड्यांवर तुम्ही घालू शकता.

कांजीवरम किंवा सिल्क साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने टेम्पल ज्वेलरी सेट घालतो. साऊथ इंडियन लग्नात नवरीच्या गळ्यात प्रामुख्याने टेम्पल दागिने असतात.

तुम्हाला जर ग्लॅमरस आणि रॉयलक टच देणारा लुक हवा असेल तर तुम्ही कुंदन किंवा पोल्की सेट घालू शकता. हे दागिने प्रामुख्याने राजस्थानी महिला घालतात.






