दरवर्षी अनेक चित्रपट चित्रपटसृष्टीत प्रदर्शित होत असतात. यातील काही चित्रपट हिट होतात तर काही चित्रपट फ्लाॅप होतात. पण काही चित्रपट असेही असतात जे रिलीज होण्याआधीच त्यांच्यावर बंदी घातली जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दर्जदार चित्रपटांविषयी माहिती सांगणार आहोत ज्यांची कथा समाजाला अनेक गोष्टी शिकवून जाते. खरंतर चित्रपटांमधील काही संवेदनशील विषयांमुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण चिंता करु नका, तुम्ही हे चित्रपट आजही यूट्यूबवर पाहू शकता.
जागाचा दृष्टिकोन बदलवून टाकणाऱ्या या चित्रपटांवर घालण्यात आली आहे बंदी; फक्त Youtube वर पाहायला मिळेल
"वॉटर" हा दीपा मेहता दिग्दर्शित २००५ चा हिंदी चित्रपट आहे ज्यावर सरकारने बंदी घातली आहे. हा चित्रपट भारतातील विधवांच्या जीवनावर आधारित आहे. पूर्वीच्या काली महिलांवर कशी वाईट वागणूक दिली जायची, बालविवाहाची प्रथा या सर्व मुद्यांवर हा चित्रपट भाष्य करतो.
अमित कुमार यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनफ्रीडम’ चित्रपटावरही सरकारने बंदी घातली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या कथेत बदल करण्याची मागणी केली होती पण निर्मात्यांनी ही मागणी नाकारली
या यादीत समाविष्ट होणारा आणखीन एक चित्रपट म्हणजे ‘लोएव’. हा चित्रपट LGBTQ+ रोमँटिक ड्रामा आहे. सुधांशू सारिया यांनी तो लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट तुम्ही युट्युबवर पाहू शकता
"फायर" हा 1996 साली प्रदर्शित झालेला एक चित्रपट आहे, जो दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातही समलैंगिकतेवर भाष्य करण्यात आले आहे.
"मिस्टर इंडिया" हा १९८७ साली प्रदर्शित झालेला एक लोकप्रिय हिंदी चित्रपट आहे. पण प्रदर्शनाच्या काही दिवसांतच या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली. शेखर कपूर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी असे अनेक दिग्ग्ज कलाकार सामील आहेत.