शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उच्च रक्तदाब वाढण्याची अनेक कारण आहेत. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव, शारीरिक तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे उच्च रक्तदाब वाढू लागतो. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या औषधी वनस्पतींचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या औषधी वनस्पती घरात सहज उपलब्ध होतात.(फोटो सौजन्य – iStock)
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधी वनस्पती
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये अश्वगंधाचा वापर केला जात आहे. बाजारामध्ये सहज अश्वगंधा पावडर उपलब्ध होते. शरीरात वाढलेला तणाव आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्वगंधा पावडरचे सेवन करावे.
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहील.
ओव्याच्या बियांमध्ये फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. पोट दुखी किंवा आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर ओवा खाण्यास दिला जातो. ओवा खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
लसूणचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. लसूण टाकल्यामुळे जेवणाची चव आणि सुंगध वाढतो. याशिवाय लसूणमध्ये आढळून येणारे गुणधर्म रक्तवाहिन्यांना आराम देतात. नियमित एक किंवा दोन कच्ची लसूण चावून खाल्यास रक्तदाब नियंत्रणात राहील.
तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. शरीरातील रक्तदाब वाढल्यानंतर तुळशीच्या पानांचे सेवन करावे. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.