भारताच्या दोन खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच धक्का बसला होता त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक परदेशी संघांमधून देखील निवृत्तीच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामध्ये मॅक्सवेल, हेनरिक क्लासेन, स्टीव्ह स्मिथ यांसारखे दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. 2025 मध्ये कोणकोणत्या खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली यासंदर्भात जाणून घ्या.
2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेले खेळाडू. फोटो सौजन्य - Instagram

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून मागील महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती, त्याआधी त्याने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर टी-ट्वेंटी क्रिकेटमधून देखील क्रिकेटला अलविदा केला. फोटो सौजन्य - Instagram

आज म्हणजेच 10 जून रोजी वेस्ट इंडिजचा स्टार निकलस पुरण याने 29 वर्षांमध्येच त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्याने या सिझनमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत खेळला आणि कमालीची कामगिरी केली. फोटो सौजन्य - Instagram

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती आयपीएल 2025 मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळला होता. फोटो सौजन्य - Instagram

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती त्यानंतर मे महिन्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. फोटो सौजन्य - Instagram

पंजाब किंग्समधून या सीझनमध्ये खेळणारा ग्लेन मॅक्सवेल याने आयपीएल २०२५ मध्ये दुखापतीनंतर स्पर्धा सोडल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. तो सध्या क्रिकेटमध्ये खराब फाॅर्मशी झुंजत होता. फोटो सौजन्य - Instagram

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन ट्रॉफीनंतर एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते.






