महाराष्ट्रात विविध जाती धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाची बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, पोशक अतिशय वेगळा आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक गावात, राज्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर असते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पदार्थांची चव चाखण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक भारतामध्ये येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील फेमस पदार्थांबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे नाव ऐकताच तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटेल.(फोटो सौजन्य – iStock)
महाराष्ट्रातील 'या' खमंग पदार्थांची नावं ऐकताच तोंडाला सुटेल पाणी
महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडे सणावाराच्या दिवसांमध्ये पुरणपोळी हा गोड पदार्थ प्रत्येक घरात बनवली जाते. पुरणपोळीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.
गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या दिवशी प्रत्येक घरात मोदक बनवले जाते. ओलं खोबर आणि गुळाचा वापर करून बनवलेले मोदक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पिठलं भाकरी हा पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहे. यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा इतर कोणत्याही भाकरी, चपाती खाऊ शकता.
मुबंईचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वडापाव. बटाट्याची भाजी, बेसन पिठाचा वापर करून बनवलेला वडा आणि त्यासोबतच दिला जाणारा पाव सगळ्यांच्या खूप आवडीचा आहे.
कोल्हापूरचे नाव ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर येणारा पदार्थ म्हणजे चिकन तांबडा पांढरा रस्सा. या पदार्थांची चव चाखण्यासाठी लाखो पर्यटक कोल्हापूरमध्ये जातात.