भारताची हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड संपूर्ण देशात नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक वर्षी बॉलिवूड अनेक बिग बजेट आणि दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. हे चित्रपट संपूर्ण देशभरात पाहिले जातात मात्र तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडच्या काही लोकप्रिय चित्रपटांना पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. बॉलिवूडच्या काही चित्रपटांचा कथानक असा आहे की त्याने पाकिस्तानची चिंता वाढली आणि त्यांनी थेट देशात त्या चित्रपटांवरच बंदी घातली. यात कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
पाकिस्तानची फाटली... घाबरून या भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानने घातली बंदी
सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित चित्रपट 'एक था टायगर' पाकिस्तानात बॅन करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे, यात भारतीय रॉ आणि पाकिस्तानी आयएसआय एजंटमधील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. आयएसआयच्या उल्लेखामुळे पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातल्याचे म्हटले जाते
2016 मध्ये आलेला आमिर खानचा 'दंगल' हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रचंड गाजला. मात्र, या चित्रपटावरही पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे कारण चित्रपट दाखवण्यात आलेला भारतीय झेंडा आणि राष्ट्रगीत असल्याचे म्हटले जात आहे.
आलिया भट्टचा 'राझी' चित्रपट संपूर्ण देशभर एक सुपरहिट चित्रपट ठरला. यात भारतीय महिला गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे, जी पाकिस्तानमधील अधिकाऱ्याशी लग्न करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते. चित्रपटाची कथा पाकिस्तानला पटली नाही ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली
सनी देओल आणि अमिषा पटेलच्या 'गदर' चित्रपटावरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. यात भारत-पाकिस्तानमधील तणाव दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला पाकिस्तानात प्रदर्शित होऊ दिले नाही
धनुष आणि सोनम कपूरचा 'रांझणा' हा चित्रपट एका हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलींमधील प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथानक पाकिस्तानला पटली नाही ज्यामुळे या चित्रपटावरही अखेर बंदी घालण्यात आली