हळदी समारंभात हल्ली सर्वच मुली साडीला मॅच होतील असे फुलांचे किंवा सोन्याचे दागिने परिधान करतात. साडीला मॅचिंग असलेल्या दागिन्यांमध्ये लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. मुली लग्नाची खरेदी दोन ते तीन महिने आधीपासूनच करतात. त्यामध्ये हळदीला नेसली जाणारी साडी, फुलांचे दागिने इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हळदी समारंभात घालण्यासाठी फुलांच्या काही सुंदर डिझाईन्स आज आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
हळदी समारंभात फुलांचे 'हे' दागिने नवरीवर दिसतील शोभून
काहींना खूप नाजूक साजूक दागिने परिधान करायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही बारीक फुलांपासून बनवलेले सुंदर दागिने घालू शकता. हे दागिने अतिशय सुंदर दिसतील.
हळदीमध्ये तुम्हाला जर युनिक दागिने हवे असतील तर तुम्ही या पद्धतीची सुंदर ओढणी तयार करून हळदीमध्ये घेऊ शकता. या ओढणीमध्ये तुमचा लुक इतरांपेक्षा थोडा वेगळा दिसेल.
मोठ्या पांढऱ्या फुलांचे दागिने हळदीमध्ये घातल्यास तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल. पांढरी फुले पिवळ्या साडीवर अतिशय आकर्षित दिसतात.
हळदीमध्ये तुम्हाला जर वेस्टन लूक हवा असेल तर तुम्ही ऑर्किडच्या फुलांपासून बनवलेले सुंदर दागिने घालू शकता. ऑर्किडच्या फुलांपासून गळ्यातील हार, बांगड्या, मांगटिका इत्यादी दागिने बनवू शकता.
बारीक पांढऱ्या फुलांपासून तयार केलेले सुंदर दागिने हळदीमध्ये अतिशय उठावदार दिसतील. पांढऱ्या फुलांमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे कॉम्बिनेशन करून तुम्ही दागिने बनवून घेऊ शकता.